ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे आढळल्यास कायदेशीर कारवाई -सपोनि रवींद्र मांजरे.

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख

ऑपरेशन परिवर्तन उपक्रम राबविण्यात येणार मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांची ग्वाही

दक्षिण सोलापूर तालुक्यातील
मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्रयत्नशील असून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या
ऑपरेशन परिवर्तन उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याची ग्वाही मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शनिवारी, मंद्रूप पोलीस ठाण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांनी वार्तालाप आयोजित करण्यात आला. त्यावेळी रवींद्र मांजरे बोलत होते.
प्रारंभी दक्षिण सोलापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने मांजरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मांजरे बोलत होते. रवींद्र मांजरे हे माढा तालुक्यातील लऊळ गावचे असून ते सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे शिक्षण एम.एस्सी ॲग्री झाले आहे. त्यांनी २०१० साली गोंदिया येथे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेस सुरूवात केली आहे. तेथे ५० कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अॅकँडमी अगदी छान चालवली. कृषीचे शिक्षण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शनही करत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांची सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. पुणे पोलीस ग्रामीणमध्ये उल्लेखनीय काम केले. त्यानंतर सोलापुरात स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
बोरामणी खून प्रकरण व मंगळवेढा येथील चोरीच्या प्रकरणात गुन्हेगार शोधण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ते म्हणाले, यावेळी मांजरे म्हणाले,भीमा कोरेगाव यासारख्या विषयावर काम केले आहे. आता मी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे निर्णय,अवैध धंदे चालू देणार नाही या घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. या चार महत्त्वाची विषयावर काम आहे.हद्दीतील ३८ गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करू.आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय आपण चालू देणार नाही. तसेच या भागातील गुन्हेगारीवर अकुंश ठेवण्यावर आपला भर राहील. जनतेला येथे नक्कीच न्याय मिळेल, असे यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले
नांदणी येथील आरटीओ महामार्गावरील वाहनांसाठी अडचणी ठरणाऱ्या रस्त्यावरील सिमेंट काँक्रिटच्या गट्टू एका झटक्यात काढून टाकण्यात महत्त्वाचे पुढाकार घेतला असून त्यामुळे वाहन धारकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे अनेक वाहने चालविताना धडक सुद्धा होती.त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची अडथळा त्या ठिकाणी होणार नाही

error: Content is protected !!