ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला नगरपरिषदेमधील विकास कामांचा आढावा*

 

*येवला,दि.६ ऑगस्ट :-* येवला शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून भविष्यातील विचार करून विकास कामांचे नियोजन करण्यात यावे. तसेच येवला शहराचे सौंदर्यीकरण व शहर स्वच्छतेबाबत अधिक प्राधान्य द्यावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालय येथे अधिकात्यांसमवेत येवला शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी विविध सूचना केल्या.

यावेळी तहसीलदार प्रमोद हीले, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुटकेकर, शहर अभियंता जनार्दन फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुकेश पवार,शहर पोलिस निरिक्षक भगवान मथुरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,वसंत पवार,दीपक लोणारी, प्रवीण बनकर, दत्तात्रय निकम, निसार शेख, मलिक मेंबर,यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

येवला शहर भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रकल्प सुप्रमा प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्यात यावा. अमृत २ अभियानामधून येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना अंतर्गत साठवण तलावाची क्षमता वाढवणे किंवा नवीन साठवण तलाव निर्माण करणे,३.५ व ९ .५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती करणे, नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करणे, शहरात विविध ठिकाणी वाढीव कुटुंबांसाठी अंतर्गत वितरण व्यवस्था निर्माण करणे, जलवाहिन्या बदलणे, जलशुद्धीकरण केंद्र येथील वीजबचत करणेकामी सौरउर्जा प्रकल्प, शहरात नळ जोडणीला वॉटर मीटर बसविणे, अमृत २ अभियानामधून हरित क्षेत्र प्रकल्पा अंतर्गत साठवण तलाव संवर्धन यासह आवश्यक पाणीपुरवठा विभागाचे प्रस्ताव महिनाभराच्या आत सादर करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शहर सौंदर्यीकरण अभियान राबवून शहरातील चौकांचे सुशोभीकरण करणे,अहिल्यादेवी होळकर घाट , ट्राफिक पार्क , बोटिंग क्लब यासह विविध प्रकल्पांची सीएसआर निधीतून देखभाल करून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, व्यापारी यांना जबाबदारी निश्चित करून देण्यात यावी. शहरातील रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी. शिवसृष्टीसमोर आणि विंचूर चौफुलीवर नो पार्किंग झोन करण्यात यावा. येवला शहरातील नगररोड व विंचूररोड वरील स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

येवल्यात तयार करण्यात आलेल्या व्यापारी संकुल व बाजार तळ येथील व्यावसायिकांसाठी लिलाव प्रक्रिया राबवून गाळ्यांचे वाटप करण्यात यावेत. शहरात अग्निशमन केंद्र विकसीत करण्यात येऊन बाजारतळ भागातील अपूर्ण कॉक्रीटीकरणाचे कामे पूर्ण करण्यात यावीत तसेच बाजार तळासाठी अधिक जागा आरक्षित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

तसेच स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे स्मारक कामाचा आढावा घेऊन केशवराव पटेल मार्केटच्या जागेवर वाणिज्य संकुल व बहुमजली वाहनतळ, विंचूर चौफुलीवरील वाणिज्य संकुल निर्माण करणे,जुनी नगरपालिका इमारतीमध्ये इतिहास संग्रहालय व इतर अनुषंगिक कामे, पालखेड कॅनालमधून येवला नगरपालिका साठवण तलावात इनलेट गेट टाकणे,वेदनगर मधील अभ्यासिका – ई अभ्यासिका सुरु करणे, शहराचा वाढता विस्तार बघता बाहयरिंग रोडचा अभ्यास करणे, शहरात दोन नागरी आरोग्य केंद्र सुरु करणे यासह विविध कामांचा आढावा घेऊन कामांचे योग्य नियोजन करून गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.निकृष्ट कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.

error: Content is protected !!