ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

जैन साधू साध्वी कडे पाहिल्यानंतर सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळते – आमदार रोहित पवार

जैन साधू साध्वी कडे पाहिल्यानंतर सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळते – आमदार रोहित पवार
जामखेड प्रतिनिधी ;-आमदार रोहित पवार म्हणाले ,जामखेड मध्ये जैन मंदिर चे कार्य चालू आहे या कामासाठी केव्हाही मला सांगा मी तुम्हाला तन-मन धनाने मदत करेल तसेच आज शरद शिंगवी, शितल गांधी, रोहन कोठारी यांनी उपवास केले आणि अनेकांनी उपवास केले सर्वांना मी शुभेच्छा देतो तसेच मागील वर्षांमध्ये माझ्याकडून काही मन दुखवले असल्यास मी आपणा सर्वांना क्षमा मागतो मीछामी दुकडम असे ते म्हणाले,जामखेड येथील जैन स्थानकामध्ये पर्युषण पर्व  निमित्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते
यावेळी परमपूज्य चारुप्रज्ञाजी महाराज म्हणाल्या , आपण येथून पुढे जैन समाजाला वेळोवेळी जिथे अडचण येईल त्यावेळी सहकार्य करावे. आपण सर्वांचेच दादा आहेत असे ते म्हणाले.
 जामखेड येथील शरद शांतीलाल शिंगवी ३१ उपवास, रोहन संजय कोठारी यांचे ८ (आठ) उपवास आणि  (नऊ ) शितल झुंबरलाल गांधी ११
 अकरा उपवासाची तर सौ रुपाली अमोल चानोदिया यांच्या ८ आठ उपवासाची पाचकवणी बुधवार दिनांक ३१/८/२०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता जामखेड जैन स्थानकामध्ये झाली.
परमपूज्य चंदनबालाजी म.सा. आणि परमपूज्य पद्मावतीजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या प्रेरणेने शरद शांतीलाल शिंगवी यांनी ३१ उपवास केले आहेत या अगोदर पण त्यांनी ३ वेळेस अशा मोठमोठ्या तपस्या केल्या आहेत त्यांच्या मातोश्रींनी आणि पत्नीने सुद्धा अशा तपस्या केल्या आहेत
 रोहन कोठारी याने  ८ उपवास करण्याचे धाडस केले आहे या अगोदर सुद्धा तेजस ने ११,८ उपवास दोन वेळेस केले होते कोठारी परिवारामध्ये तेजस चे पिताश्री संजय कोठारी आई सौ. सरला कोठारी यांनी पण या अगोदर असेच उपवास केले होते
याच वेळी शीतल झुंबरलाल गांधी यांनी पण अकरा उपवास केले आहेत या अगोदर सुद्धा त्यांनी उपवास केले होते.
  आज जामखेड जैन स्थानकामध्ये बऱ्याच जणांनी उपवास केले आहेत
जामखेड मध्ये जैन स्थानकामध्ये चातुर्मास प्रोग्राम जोरात चालू आहेत तरी तालुक्यातील सर्व जैन बांधवांनी पचकावणी साठी हजेरी लावली.
      यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते शरद शिंगवी यांना गौरविण्यात आले.या मानपत्राचे वाचन अशोक जी शिंगवी यांनी केले.
 या कार्यक्रमासाठी जामखेड कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार,  जैन श्रावक संघाचे ट्रस्टी अशोक शिंगवी,राजेंद्र कोठारी,मधुकर राळेभात,रमेश गुगळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,सुरेश भोसले,शांतीलाल शिंगवी, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रवीण चोरडिया, पिंटू बोरा, अभय शिंगवी ,महावीर बाफना, प्रविण बाफना,अशोक बाफना,मंगेश बेदमुथा,संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सेक्रेटरी दिलीप गुगळे एडवोकेट नवनीतलाल बोरा, सुभाष भंडारी, विजय गुंदेचा ,प्रशांत बोरा, कुंदनमल भंडारी, कांतीलाल मोहनलाल भळगट, आसराज बोथरा ,संदीप बोगावत,सुनील कोठारी, विजय गुंदेचा, संजय गुंदेचा, संजय नहार ,संतोष लोढा, सुनील पितळे प्रवीण छाजेड, आनंद गुगळे , गौतम बाफना,मनोज भंडारी ,महेंद्र बोरा , संपतलाल बोरा, सुमित चानोदिया, गणेश भळगट, संजय गांधी, प्रफुल्ल सोळंकी, अमोल ताथेड, अमोल चानोदिया,मनसुखलाल गांधी वसंतलाल गांधी, सूवालाल गांधी शहरातील सर्व जैन समाज महिला पुरुष उपस्थित होते.
चौकट
जामखेड मध्ये जैन मंदिर चे कार्य चालू आहे, या कामासाठी केव्हाही मला सांगा मी तुम्हाला तन-मन धनाने मदत करेल .
आमदार रोहित पवार
कर्जत जामखेड विधान सभा सदस्य
error: Content is protected !!