ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग जगताची मोठी हानी-छगन भुजबळ

 

नाशिक,दि.४ सप्टेंबर :- टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्याची अतिशय धक्कादायक बातमी कळाली. अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, देशातील युवा उद्योजक सायरस मिस्त्री यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. अतिशय कमी वयात टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले. त्यांच्या निधनाने देशातील एक उमदा उद्योजक कायमचा हरपला असून उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

error: Content is protected !!