ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मंत्रालयात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा फोटो माजी मंञी छगन भुजबळसाहेब यांनी सरकारचे अभिनंदन केले

 

 

नाशिक, दि. ६ सप्टेंबर :- मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.

मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. याबाबत आज शासनाच्या वतीने मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.

त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ या महापुरूषांचे तैलचित्र लावण्यात आले आहेत.भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिला शिक्षणासाठी खुप मोलाची भूमिका बजावली आहे. आज भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती ही महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आहे.महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले, बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक क्रूर पद्धतींना त्यांनी विरोध केला. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या तैलचित्राशेजारी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली होती.

error: Content is protected !!