ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पेण तालुका अध्यक्षपदी गणेश भालेसईन यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच सभा आयोजन करण्यात आले होते…

पेण तालुका अध्यक्षपदी गणेश भालेसईन यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच सभा आयोजन करण्यात आले होते…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

आज दि.11/09/2022 रोजी पेण-रायगड येथे संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहासजी राणे व कोकण अध्यक्ष सूर्यकांत भोसले, स्वप्नीलजी म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ,कोकण कार्याध्यक्ष प्रशांतजी दरेकर,भूषण सिसोदे, वैभवजी शेडगे यांच्या सूचनेनुसार व रायगड जिल्हाध्यक्ष परमानंद जांभळे साहेब,मा.जिल्हाउपाध्यक्ष दिनेशजी माळी साहेब, जिल्हा उपाध्यक्ष आकाश कांबळे, यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग पार पडली. या मिटिंग मध्ये पेण तालुका अध्यक्षपदी गणेश भालेसईन यांची नियुक्ती करण्यात आली.तर वृषभ लाड यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्ष व श्रीकांत आगिवले यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
सदरील सभेसाठी रायगड जिल्हा अध्यक्ष परमानंद जांभळे साहेब, तालुका अध्यक्ष शिवश्री गणेश भालेसईन,,, नरेश भालेराव,शहर अध्यक्ष निरंजन सुर्वे, नितीन सुर्वे, उपाध्यक्ष रमाकांत घरत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवश्री दिनेशजी माळी साहेब यांनी बोलताना पेण, कर्जत, खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड ची बांधणी मजबूत करू तसेच लोकांचे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत अशी ग्वाही दिली.धार्मिक व सामाजिक तेढ तसेच जातीयवाद समाजातून समूळ नष्ट करा असे महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केले.
तसेच संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे व रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सुहासजी राणे यांच्या सूचनेनुसार आगामी होऊ घातलेल्या संभाजी ब्रिगेड पक्ष व शिवसेना या युती बद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष बांधणी जोमाने सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

error: Content is protected !!