ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

विंचूर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक.

विंचूर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक.

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीरांच्या मुख्य रथाचे व प्रतिमेचे पूजन विंचूर ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर गावातून कर्मवीरांच्या प्रतिमेची ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध समाजप्रबोधनपर देखावे दाखविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लेझीम पथक, झांजपथक, कलशधारी विद्यार्थिनी, वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, रिंगपथक, डम्बेल्स, घुंगुरकाठी, लेक वाचवा, शेतकरी वाचवा, स्त्री-भृणहत्या, स्वच्छता अभियान, सर्व धर्म समभाव, अंधश्रद्धा निर्मुलन, विविध देशभक्त, संत, देव यांचे देखावे , इंधन वाचवा, भजनी मंडळ, वारकरी दिंडी असे विविध देखावे, टिपरी नृत्य, आदिवासी नृत्य, नवदुर्गा नृत्य, जागरण गोंधळ, कवाली नृत्यांचा समावेश होता. मिरवणुकीनंतर सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, पं.स. सदस्य संजय शेवाळे, सरपंच सचिन दरेकर, ग्रामपालिका सदस्य, विद्यालयातील विविध समित्यांचे सदस्य, पत्रकार, ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन.ई., उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे व के.जी.जोपळे, लाईफ मेंबर आर.के.चांदे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक –शिक्षकेतर कर्मचारी तसेच मिरवणुकीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

error: Content is protected !!