ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

जनसेवा नवरात्र महोत्सव कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाकडून मोतीलाल राठोड यांचा सत्कार.

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – मंद्रुपसह परिसरात आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केलेले आर.के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांचा मंद्रुप नेहरू चौक येथील जनसेवा नवरात्र महोत्सव कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. मोतीलाल राठोड यांनी उन्हाळ्यात नागरिकांची पाण्याची वणवण पाहुन आर.के. फाऊंडेशनच्या प्रयत्नातून इंदिरानगर, वार्ड क्रं. ३, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिलाल नगर, व विठाई नगर येथील डवरी समाजातील नागरिकांना पाण्याची सोय करून दिली.
आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचा मंद्रुपसह परिसरात विविध ठिकाणी सन्मान होत आहे. मंद्रुप येथील जनसेवा नवरात्र महोत्सव कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाची देवीची पुजा आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश पाटील,नामदेव पवार कारभारी विठ्ठल पुढारी, दामू राठोड यांच्यासह जनसेवा नवरात्र महोत्सव कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते…

error: Content is protected !!