ब्रेकिंग न्युज
शारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागर

ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन वंदे मातरम् अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

 

वर्धा : “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा हे उद्दिष्ट साध्य झाले ; स्वातंत्र्याचे उद्दीष्टच गुलामगिरीतून सुटका आणि शेवटच्या घटकाचे कल्याण हे होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याचे यशस्वी नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले तर गरीबासाठी कल्याणकारी योजना राबवून सुराज्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असे प्रतिपादन वन, सांस्कृतिक कार्य मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
वर्धा येथे आयोजित राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप , नदी महोत्सव शुभारंभ , हॅलो ऐवजी वंदे मातरम् शुभारंभ अश्या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.

२०१४ ते २०१९ या काळात फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यासाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. वर्धा जिल्ह्याच्या भूमीतून स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला. ‘चले जाव’ आणि ‘भारत छोडो’चा मंत्र देण्यात आला, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर आणि वर्धा आष्टी या दोन जिल्ह्यांत क्रांती झाली. युनियन फ्लॅग खाली आला आणि तिरंगा वर चढला आणि त्यानंतर देश स्वतंत्र झाला, असेही श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आज वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ सीडी प्रकाशित करून झाला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, गांधीजी की जय, लालबहादुर शास्त्री की जय आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देऊन भाषणाची सुरुवात केली. व्यासपीठावर आजच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विशेष मार्गदर्शक जलपुरूष मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्र सिंग, खासदार रामदास तडस, आमदार नागोराव गाणार, आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार रणजीत कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. शाहीर नंदेश उमप आणि गायिका बेला शेंडे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्याचा संग्राम गांधीजींच्या नेतृत्वात सुरू झाला आणि सुराज्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात सुरू झाला. त्यासाठी हा सेवा पंधरवडा आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांच्या व्यासपीठावर ही सुरुवात झाली. राज्याने ही सुरुवात केली. जो जो वांछिल तो ते लाहो, या भावनेने मोदी काम करत आहेत. आई आपल्या मुलाचे कधीही नुकसान होऊ देत नाही, त्याचप्रमाणे मोदीसुद्धा देशाच्या एकाही नागरिकाचे नुकसान होणार नाही, यासाठी काम करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन २०२० मध्ये करायचे होते. पण दोन वर्ष उशीर झाला. आज फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झाले, याचा अभिमान आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे न्यायाचं मंदिर व्हावं, ही जबाबदारी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या खांद्यावर आता आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

हा परिसर १८६२ मध्ये वर्धेचा भाग झाला. पूर्वी वर्धा हा नागपूर जिल्ह्यात होता. मी पालकमंत्री असताना अर्धवट राहिलेली कामे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. आता ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता “डी”फॉर “देवेंद्रच” नाही तर “डी” फॉर “डेव्हलपमेंट”, असे असेल. यापूर्वी आमच्या सरकारच्या काळात नाट्यगृहाचा जीआर शेवटी काढण्यात आला. नंतर अडीच वर्ष आपले सरकार नव्हते. आता प्रत्यक्ष नाट्यगृहाशी माझा संबंध येत नसला तरी मी मागेल ते मला फडणवीस देतात. त्यामुळे नाट्यगृह लवकरच होईल, असा विश्‍वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!