ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

धारूर तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,

धारूर तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,
 सय्यद सलीम बापू यांच्या वतीने जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन
बीड (प्रतिनिधी) :- धारुर तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमीनी विषयी झालेल्या फेरफार,रजिस्ट्री व पी.टी. आर . देणाऱ्या तत्कालीन तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी , रजिस्ट्री ऑफीस व नगर परिषद यांची चौकशी करुन यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दि . १८/१०/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत उपोषण अशा आशयाचे निवेदन लोकतांत्रिक जनता दलचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
          धारूर धारूर तालुक्यात वक्र मंडळ अंतर्गत येणाऱ्या देवस्थान  दीड हजार च्या जवळपास देवस्थानाची जमीन इनामी जमिनी आहे सुधारित देवस्थान जमिनीवर मोठ्या प्रमाणात धारूर तहसील कार्यालय मंडळ अधिकारी तहसीलदार नगरपरिषद कार्यालय यांच्या संगणमाता आणि मोठ्या प्रमाणात फेरफार व रजिस्टर चे प्रकार झाले आहेत तरी सगळ्यात वरील प्रकरणात धारूर तालुक्यातील स.नं .५४८ / १०,५४८ / १ ९ , ५४८/१३ , ५४८/६ , ५४८/७ , ५४८ / ९ , ५५४/१ , ५५४ / २ , ५५४/५ , ५५४/६ , ५५४/७ , २०५ , २०६/१ , ३४३ , ३५ , ३५१ , ३५२ , ३५४ , ३५६ ३५७ , ३६०/२ , ३४ , ३६२ / अ / २ , ३६५ , ३६ ९ , ३७० , ३७२ , ३७६ , ३७८ , ५ , ५५,५५३ , ५६०/१ , ६२२ , ६२४ अ , ६२४ आ , ५ ९ १ तसेच काझी मशिदीचे स.नं. ३ , ५ , ३५३ , ५४२ , ५६६ , ५४३ , ५५८ , ५४४ , ५५७ , ५४६ , ५४७ , ५५ ९ , ५६४ , ५६७ , ५६८ , ५ ९ २ , १३५ , १७३ , ९ ७४ , १७५ , १७६ , १८७ या सर्व्हे नंबर मध्ये जवळपास ५१५ एकर जमीन आहे.धारुर तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमीनी विषयी झालेल्या फेरफार,रजिस्ट्री व पी.टी. आर . देणाऱ्या तत्कालीन तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी , रजिस्ट्री ऑफीस व नगर परिषद गैरव्यवर झाली आहे.व सदरील संपूर्ण जमीनीची विल्हेवाट संबंधीत अधिकारी यांनी कायद्याचा व पदाचा दुरुपयोग करुन लावलेली आहे.उच्चत्तम न्यायालय व शासन जी.आर.ची सुध्दा पायमल्ली करण्यात आलेली आहे . अंदाज 2 हजार एकर जमीन आहे मा.अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई व मा . उपविभागीय अधिकारी माजलगाव हे अधिकारी भूमाफियांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत . धारुर एम.आय.डी.सी.ची • सुध्दा जमीन इनामी असून चालू असलेले काम तात्काळ थांबविण्यात यावे व या जमीनीवर स्टे – ऑर्डर देण्यात यावे.
       व त्याचप्रमाणे देवस्थाना बरोबर धारुर तालुक्यातील गायरान जमीनीची सुध्दा विल्हेवाट लावलेली आहे.राजपत्रात देवस्थानाची नोंद असलेल्या जमीनीची फेरफार आजसुध्दा चालू आहे तरी मंडळ अधिकारी यांनी तात्काळ नोंद घेणे बंद करावे . धारूर तहसील कार्यालय हे काही दलाल मंडळी व भूमाफिया यांच्या नियंत्रणात काम करीत आहे.धारूर तहसीलचे रेकॉर्ड रूम मध्ये सुध्दा मोठा गोंधळ निर्माण केलेला आहे व येथील अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कसलेच नियंत्रण नाही . यापूर्वी सुध्दा अनेक वेळा आंदोलने,निवेदन देवून सुध्दा या विषयी कसलीच कार्यवाही झालेली नाही.तरी झालेले बेकायदेशीर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्यती कार्यवाही करावी अन्यथा दि . १८/१०/२०२२ रोजी आपल्या कार्यालयसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन लोकतांत्रिक जनता दलचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी एडवोकेट सय्यद अल्ताफ,शेख इलियास भाई सह आदी उपस्थित होते,
error: Content is protected !!