ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

थेट कुडाळातून भास्कर जाधवांचा राणेंवर हल्लाबोल, केले गंभीर आरोप

 

आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ आज कुडाळमध्ये एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.या मोर्चानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. राणेंना गेल्या आठ वर्षांत कुणी सभेसाठी बोलावलेलं नाही. नेते देशाचे आणि गल्लीतलं कुत्रही विचारत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

भास्कर जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गातील कोंबडीवाले, बेडूक यांनी रे रोडला एक प्रोजेक्ट उभा केला. या प्रोजेक्टमध्ये ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू करावी म्हणून याच भाजपामधील किरीट सोमय्यांची मागणी करण्यात आली होती. आज मंत्रिमंडळात बसलेले ५०-५५ टक्के लोक, आमदार यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले होते. तेच लोक भाजपामध्ये गेल्यावर अगदी साफ स्वच्छ होतात. निरमा पावडरचा कारखानाच भाजपाच्या घरात सुरू झाला आहे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

या कोंबडीवाल्यांनी साडे अठरा वर्षांपूर्वी यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतच नाही. मात्र नारायण राणे हे गेली १८ वर्षे एकच वाक्य बोलताहेत की मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेलं आणि शिवसेना संपली, बरं मीसुद्धा शिवसेना सोडली होती. पण टीका करण्याची एक मर्यादा असते, असे भास्कर जाधव म्हणाले.

error: Content is protected !!