ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

येळंब घाट मध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले ; भर स्टॅण्डवर तासभर राडा.

येळंब घाट मध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले ; भर स्टॅण्डवर तासभर राडा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड तालुक्यातील नेकनुर पोलिस स्टेशन हद्दीतील येळंब घाट मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. तुम्ही नेकनूरच्या व्यापाऱ्यास गुजरातच्या व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर का दिला ? अशी कुरापत काढत येळंब घाट मध्ये तलवारीने एकावर वार केल्याची घटना काल दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली आहे. तलवारीने वार केल्याचा आरोप दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
वसीम मन्सूर शेख (वय ३०, रा. येळंब घाट) यांनी नेकनूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नदीम सालार शेख, अजीम सालार शेख, सालार हसन शेख, अफसर हसन शेख (सर्व रा. येळंब घाट) यांनी संगनमत करून मला व माझ्या वडिलांना तुम्ही नेकनूरच्या व्यापाऱ्यास गुजरातच्या व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर का दिला ? अशी कुरापत काढून नदीम सालार शेख याने डोक्यात तलवार मारून गंभीर जखमी केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वरील चौघा जणांविरोधात नेकनूर पोलिसात कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु या भांडणादरम्यान लाठ्या काठ्यांसह दगडांनी मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. हा वाद सकाळी ८:३० च्या दरम्यान सुरू झाला होता. वाद भर स्टॅण्डवर तब्बल तासभर सुरू होता. यानंतर गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. रक्तबंबाळ अवस्थेत एकाला नेकनुर रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. यानंतर नेकनुर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील आरोपी फरार असुन त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पी.एस.आय. विलास जाधव यांनी दिली आहे.

error: Content is protected !!