ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

राज्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार-छत्रपती संभाजीराजे.

राज्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार-छत्रपती संभाजीराजे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड | प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्यात तथा बीड जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी हे ग्रामीण भागात विविध वैद्यकीय सेवा पुरवत आहेत किंबहूना ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतात. ज्यात प्रामुख्याने गरोदर माता तपासणी, त्यांचे समुपदेशन, उपचार तसेच अति जोखमीच्या माता शोधणे. त्यांना उपचार देणे तसेच तीस वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करणे ज्यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब ,मधुमेह, कर्करोग, इत्यादी तपासण्या करणे. तसेच कुपोषणग्रस्त बालके शोधणे त्यांना संदर्भीय सेवा देणे इत्यादी.
तसेच वेळोवेळी केंद्र सरकार व राज्य सरकारने निर्गमित केलेल्या मोहिमा/ योजना यांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण स्तरावर करणे इत्यादी कामे समुदाय आरोग्य अधिकारी करतात. तसेच उपकेंद्र स्तरावरील इतर कर्मचारी यांना मॉनिटरिंग करणे, त्यांच्या कार्याचा आढावा घेणे व सर्व व्यवस्थापकीय कामे पाहणे व त्याचे नियोजन करणे इत्यादी जबाबदाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी पार पाडत असतात व त्यांना याचा कामावर आधारित मोबदला भेटतो. परंतु सध्या या अधिकाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रामुख्याने
बीड जिल्ह्यात डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत अतीशय चांगल्या प्रकारे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना कामावर आधारित मोबदला भेटत होता परंतु सध्या ऑक्टोबर 2021पासून अतिशय कमी भेटत आहे.व इतर जिल्ह्यांचा विचार करता बीड जिल्ह्यात कमी भेटत आहे .
सर्व समुदाय आरोग्य अधिकारी चांगल्या प्रकारे काम करत असूनही त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे ,त्यामुळे हे अधिकारी नोकरी सोडण्याचा विचारात आहेत.
तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाला न शोभणारे कामे सांगितले जातात तसेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कर्तव्य करण्यास सांगतात.
करोना सारख्या महामारी मध्ये सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड सेंटर मध्ये कर्तव्य बजावले आहे परंतु त्याचे काहीच मानधन भेटले नाही.
तसेच कोरोना लसीकरणांमध्ये कोविड वॅक्सिन व्हेरी फायर म्हणून काम केलेला कोणताही निधी भेटलेला नाही.
इत्यादी मागण्यासाठी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांच्याशी भेट घेऊन या उपरोक्त मागण्यासाठी निवेदन दिले. व छत्रपती संभाजी राजे यांनी यासाठी आम्ही पुढाकार घेऊ व राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय कसा घेता येईल याबद्दल आश्वासन दिले व महाराष्ट्र राज्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी सुद्धा माननीय आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी वारंवार चर्चा करू व त्याचा वारंवार पाठपुरावा करू . असा सकारात्मक प्रतिसाद व आत्मविश्वास राज्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना स्वराज्य प्रमुखांनी दिला आहे ,यावेळी राष्ट्रीय छावा संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गंगाधर नाना काळकुटे व त्यांचे शिस्ट मंडळ उपस्थित होते. सोबत ऑल इंडिया समुदाय आरोग्य अधिकारी महाराष्ट्र राज्य महासचिव डॉ.दत्ता मुळे उपस्थित होते.

error: Content is protected !!