ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

*अक्षर सेवाभावी संस्थेकडून बीड जिल्हास्तरावरील यशस्वी कर्मचारी खेळाडूंचा सन्मान*

केज दि २०( प्रतिनिधी)
बीड जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेत 12,13 नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचारी यांनी दैदीप्यमान कामगिरी केली यामध्ये सोनाली राऊत गटशिक्षणाधिकारी कार्यालय थाळीफेक व लांब उडी मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक, योजना सातव शिक्षिका चिंचोली माळी यांनी भालाफेक मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक, गीता अंडील गोळा फेक मध्ये जिल्हा द्वितीय क्रमांक, अण्णा कदम शिक्षक भालाफेक जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तर श्रीकांत कांबळे यांनी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये बीड जिल्यात प्रथम क्रमांक मिळवला या यशाबध्दल अक्षर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था केज यांच्या वतीने शनिवार रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी सुनील जी केंद्रे प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी श्रीमती शेप , माजलगाव गटशिक्षणाधिकारी श्री बेडसकर सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, यांच्या उपस्थितीत सर्व सत्कारमूर्तींचा सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये यापेक्षा अधिक दैदिप्यमान कामगिरी करण्याबाबत विचार मंथन करण्यात आले सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा यापेक्षा अधिक व्यापक नियोजनबद्ध पुढील स्पर्धा पार पाडण्याबाबत चर्चा करण्यात आली महिला कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग याबाबत विशेष कौतुक करण्यात आले. सर्व सहभागी महिला खेळाडू मेघना नेहरकर, हेमलता कुलकर्णी, विजया धिवार, स्वाती शेप, अश्विनी गिरी, कोल्हे मॅडम सन्मान करण्यात आला. तसेच सांघिक खेळातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू /कॅप्टन यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यामध्ये क्रिकेट कर्णधार श्री.अतिश गाढवे, कबड्डी कर्णधार श्री. महादेव ढाकणे, खो-खो कर्णधार श्री. राहुल काकनाळे, व्हॉलीबॉल कर्णधार श्री तुषार पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत चा अनुभव अंडील मॅडम, शिवकुमार कोरसाळे सर यांनी अनुभव व्यक्त केले, तसेच मान्यवरांपैकी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चाटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना यापुढे अधिक व्यापक उत्कृष्ट नियोजन करू स्पर्धेच्या नियोजनासाठी दहा हजार रुपये देणगी जाहीर केली. श्री बेडसकर , श्री केंद्रे , श्रीमती शेप मॅडम या सर्व अधिकारी यापुढे उत्तम नियोजन करून करण्याची ग्वाही दिली अक्षर सेवाभावी संस्थेतर्फे राबवले जाणारे उपक्रम ‘दिवाळीनिमित्त गरजूंना फराळ वाटप कार्यक्रम’, ‘उन्हाळ्यातील बस स्टैंड वरील पाणपोई’, तालुक्यातील सर्व शाळेंना ‘कॅलेंडर वाटप’, तालुक्यातील ‘कर्मचारी खेळाडूंचा सत्कार सन्मान सोहळा’ कोविड कालावधीतील मदत कार्य या प्रभावी उपक्रम अंमलबजावणी बद्दल अक्षर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केज सर्व पदाधिकारी अध्यक्ष यादव,सचिव विक्रम डोईफोडे , उपाध्यक्ष युवराज हिरवे , सहसचिव राहुल काकनाळे , महादेव ढाकणे, सदस्य किशोर भालेराव, राहुल उंडाळे या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. राहुल गालफाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षर सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष युवराज हिरवे यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम डोईफोडे यांनी तर आभार राहुल उंडाळे यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

सोबत फोटो

error: Content is protected !!