ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

विद्यार्थी युवकांच्या स्पर्धा परिक्षा व क्रिडाविषयक तयारीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर कटीबद्ध -आमदार राजुभैय्या नवघरे

 

वसमत प्रतिनिधी-

यशवंतराव चव्हाण सेंटर , मुंबई , जिल्हा केंद्र , हिंगोलीच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त हु. बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हा केंद्र हिंगोलीचे अध्यक्ष आमदार राजुभैय्या नवघरे म्हणाले की विद्यार्थी युवकांमध्ये खुल्या व निकोप वातावरणात घेण्यात येणाऱ्या विविध बौद्धिक , सांस्कृतिक व क्रिडाविषयक स्पर्धांमुळे सर्वागिण विकास होऊन युवक कृतीशील बनतात. त्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई कटीबद्ध आहे. विद्यार्थी युवकांना पोलिस भरती , सैनिकी भरती आदीसाठी निर्माण केलेल्या ट्रॕकसुट भोवती यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना ही बौद्धिक मेजवानी देता आली याचा आनंद आहे. यावेळी प्रा. डॉ. विशाल पतंगे यांनी यशवंत निती संदर्भात मार्गदर्शन केले. स्पर्धेचा विषय ” आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार – यशवंतराव चव्हाण ” हा होता. स्पर्धेला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले. सदरील स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटात झाली. स्पर्धेचे बक्षिस वितरण दि. २५/११/२०२२ शुक्रवार रोजी हु. बहिर्जी स्मारक महाविद्यालय , वसमत येथे सकाळी ११ वाजता प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांचे “आधुनिक महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव – यशवंतराव चव्हाण ” या विषयावर व्याख्यानही होणार आहे.
याप्रसंगी प्राचार्य प्रविण शेळके , यल्लापा मिटकर आदींसह शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजा कदम यांनी केले. कार्यक्रमासाठी केशव खटींग , शिवदास पोटे , मदन कदम , गजानन नवघरे , सुरज फेगडे , नितिन नरवाडे , बुचाले सर , गोविंद चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!