ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

भास्कर जाधव यांना घेरण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी ?

 

खेड तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे .तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. हे जरी खरे असले तरी ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यातील गुहागर मतदारसंघात येणार्‍या ग्रामपंचायतीत मात्र, ठाकरे गटासमोर शिंदे गटाने आव्हान उभे केले.

गुहागर मतदारसंघ हा जाधव यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील घाणेखुंट, भेलसई, कोंडीवली, निळीक, अलसुरे (गावपॅनेल बिनविरोध), भोस्ते आणि संगलट या सात ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. गेल्या निवडणुकीत यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेने वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्याने गुहागर मतदार संघातील बर्‍याचशा ग्रामपंचायतीवरही शिवसेनेचा भगवा फडकला. मात्र राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर कोकणातील बहुतांश भागात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले.

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटाकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे गुहागर मतदार संघातील घाणेखुंट, भेलसई, कोंडीवली, निळीक, भोस्ते, संगलट या ग्रामपंचायतीमधून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात चुरशीची लढत पहायला मिळेल. त्यामुळे गुहागर मतदार संघात ठाकरे गटाला शिंदे गटाचे कडवे आव्हान असून भोस्ते, घाणेखुंट या महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळते.

भोस्ते ग्रामपंचायतीमध्ये फक्त सरपंचपदासाठी सहा उमेदवार निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. त्यामुळे भोस्तेत सरपंचपदासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. घाणेखुंट ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासह ११ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. घाणेखुंट ही लोटे औद्योगिक वसाहतीच्या नजीकची ग्रामपंचायत असल्यामुळे या ग्रामपंचायतीला मोठे वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी अटीतटीचा सामना पाहायला मिळेल.

error: Content is protected !!