ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

कोकणवासीयांना तुमची चीड नाही घृणा यायला लागली’ सतीश नारकर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

 

कोकण । मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती अशातच आता मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकण जागर यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. महामार्गावर पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झालीये. संपूर्ण कोकणात एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असणार आहे.

विविध टप्प्यात शालिनी ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, विनोद खोपकर, संदीप देशपांडे, वैभव खेडेकर, सतीश नारकर हे या पदयात्रेमध्ये सामील होणार आहे. या पदयात्रेवेळी मनसे उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी माध्यमाशी संवाद साधताना थेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

सतीश नारकर म्हणाले की, रवींद्र चव्हाण जे करत आहे ते काम नाही तर एक दिखावापणा आहे आणि भ्रष्टाचाराच पुरण या महामार्गाला बनवला आहे. हा महामार्ग न बनण्याचे कारण म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाला पैसे खाता यावे हेच आहे. आम्हाला जे शांततेचं आव्हान ते करतायत आता तुम्ही जे ६ कोटी खड्डे बुजवण्यासाठी खर्च केले आहेत आणि १५ दिवसांनी पुन्हा जे खड्डे पडणार त्याच आधी उत्तर द्या.

आज जे खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट जे तुम्ही काँट्रॅक्टराला देऊन जो फास तुम्ही महार्गावर चालत फिरत करतायत त्यावर कोकणवासीयांनी कसं शांत बसायचं. आता कोकणवासीयांना तुमची चीड नाही घृणा यायला लागली आहे आणि हा कोकणी माणूस तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अशी टीका यावेळी नारकर यांनी राज्य सरकारवर केली होती.

error: Content is protected !!