ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

लहान मुलांमधील होणाऱ्यां लैंगिक अत्याचाराविरुद्ध भाजप  विधानपरिषद आमदार उमाताई खापरे यांनी सभागृहात मांडला प्रश्न

नागपूर प्रतिनिधी –
दिवसेंदिवस लहान मुलांमधील लैंगिक शोषण व अत्याचाराचा घटनामधे मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागात अशा घटना रोज घडत आहेत परंतु मुलांमधील लैंगिक शिक्षण अभावी अशा घटना बाहेर पडत नाहीत. अशीच एक घटना मुंबईत घडली असून माटुंगा येथील मुबंई महानगर पालिका शाळेतील आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर आपल्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचाराची घटना माहे डिसेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली. डान्सच्या तासासाठी बाहेर जाताच या दरम्यान ही धक्कादायक घटना घडलेली आहे. यासंदर्भात मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
<span;>   अशीच एक घटना कल्याण मधे घडली असून नऊ वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. स्टेशन परिसरातल्या एका सोसायटी आवारातील नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. तिची गळा चिरून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या कुटुंबीयानी केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.
लहान वयात हाती आलेले मोबाईल व अश्लील व्हिडिओ सहज उपलब्ध होत असल्याने शरीरसंबंधीच्या विकृत दृष्टिकोन लहान वयातच वाढत असल्याने मानसिक तज्ज्ञांचा विचार आहे. अशा प्रकारच्या राज्यातील अनेक भागात अशा घटना घडत असून त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. महिलांवर व लहान मुलांवर होणाऱ्या अशा घटनांबद्दल नेहमीच आक्रमक नेत्या म्हणून उमाताई खापरे प्रचलित आहेत.

error: Content is protected !!