ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर
राजुरी गणाची रूईलिंब्यात कॉर्नर सभा
बीड दि.२ (प्रतिनिधी):- या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवार जरी बजरंग सोनवणे असले तरी आपणच उमेदवार आहोत असे समजून काम करा. आणि आपल्या उमेदवाराला मतदानरूपी आशिर्वाद द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी राजुरी पंचायत समिती गणातील रूईलिंबा येथील कॉर्नर सभेत केले.
            राजुरी न. पंचायत समिती गणातील गावांची रुईलिंबा येथे गुरुवारी (दि.२) रोजी कॉर्नर सभा झाली. यादरम्यान ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची असून आपणच उमेदवार आहोत असे समजूनच काम करावे लागेल. आणि परिवर्तन आणण्यासाठी व आपले महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या पुरोगामी विचाराच्या उमेदवाराला म्हणजेच बजरंग सोनवणे यांना मतदान रूपी आशिर्वाद देऊन मोठ्या फरकाने निवडून द्यावे लागेल याला पर्याय नाही. असे आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस माजी राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले, माजी आ.सय्यद सलीम तसेच राजुरी पंचायत समिती गणातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!