ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणे ‘शास्ती’माफीचा निर्णय, सर्व शहरांतील नव्याने सामील गावांसाठी लागू करा 

 

नागपूर: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना ‘शास्ती’माफी देण्याचा निर्णय तातडीने अंमलात आणावा. ‘शास्ती’माफीचा निर्णय सुस्पष्ट असेल, त्यात प्रशासकीय त्रूटी राहणार नाहीत, नागरिकांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पिंपरी-चिंचवडप्रमाणे राज्यातील सर्व महापालिकांसाठी ‘शास्ती’माफीचा हा निर्णय लागू करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.

विधानसभा नियम १०५ अन्वये सादर करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांच्या ‘शास्ती’माफीचा प्रश्न सुटणे आवश्यक होते. तो आता सुटला आहे.

याच बरोबरीनं राज्यातल्या अन्य शहरांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचाही सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी गावांमध्ये असलेल्या बांधकामांना अवैध ठरवण्यात आलं. या गावांसाठीही ‘शास्ती’माफीचा निर्णय होऊन तिथे सोयीसुविधा वेगाने उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

error: Content is protected !!