ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

महात्मा फुले ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस मार्डी येथे संस्थेचे माजी अध्यक्ष कै श्रीधररावजी मार्तंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ एच एस सी विद्यार्थी व्याख्यानमालाचे उद्घाटन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ मार्डी, ता.उ.सोलापूर, जि. सोलापूर संचलित महात्मा फुले ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस मार्डी ता.उ.सोलापूर येथे संस्थेचे माजी अध्यक्ष के श्रीधररावजी मार्तंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ एच एस सी (12 वी) व्याख्यानमाला गेली 16 वर्षे अव्यावहतपणे सुरु आहे. ही व्याख्यानमाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर नामवंत, तज्ञ, व्यासंगी प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे तसेच वर्षभरातील शिक्षणा व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हा व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या व्याख्यानमालेचे उद्घाटन दि 17/01/2023 रोजी प्रा.एस आर जडगे सर (एस व्ही सी एस कॉलेज सोलापूर) यांच्या शुभहस्ते झाले. त्यांनी इंग्रजी या विषयाचे पहीले पुष्प गुंफले.
या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अविनाश (दादा) मार्तंडे,संस्थेचे सर्व संचालक मंडळ,प्राचार्य सुजीतकुमार इनामदार सर, पर्यवेक्षक राजमाने सर, वर्गशिक्षीका प्रा.सारीका देशमुख व महाविद्यालयातील प्रा. शर्वरी सवणे, प्रा. अहमदी मोमीन, संतोष उमरदंड सर, श्रीम ज्योती वाघमारे मॅडम , व्याख्यानमाला संयोजक जयदत्त मार्तंडे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शाहूराजे पाटील यांनी केले.यावेळी ही व्याख्यानमाला दि.24/01/2023 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती दिली

error: Content is protected !!