ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

स्मृती ईरानींची मुलगी अडकली लग्नबंधनात, राजस्थामध्ये पार पडला शाही विवाह सोहळा

 

केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी सध्या प्रचंड चर्चेत आहेत. स्मृती ईरानी आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. स्मृती ईरानींची मुलगी शनेल ईरानी नुकतंच लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असून अखेर काल राजस्थानमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्मृती ईरानी यांची कन्या शनेल ईरानी काल राजीव भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील, नागौर याठिकाणी असलेल्या खिंवसर किल्ल्यात हे शाही लग्न पार पडलं. सध्या अनेक सेलिब्रेटी राजस्थानच्या शाही किल्यांमध्ये लग्न करण्याला पसंती देत असल्याचं दिसून येत आहे.

गेल्यावर्षी अभिनेत्री कतरिना कैफने अशाच राजस्थानमधील एका प्रसिद्ध शाही पॅलेसमध्ये लग्न केलं होतं. तर नुकतंच कियारा अडवाणीनेसुद्धा असंच केलं आहे. कियारा राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नाच्याबेडीत अडकली आहे. आता स्मृती ईरानीच्या लेकीचं लग्नदेखील अशाच शाही पॅलेसमध्ये पार पडलं आहे.शनेल आणि अर्जुन यांच्या या शाही लग्नात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत पारंपरिक राजस्थानी अंदाजात करण्यात आलं.

पॅलेसच्या बाहेर जोरदार आतिषबाजीदेखील करण्यात आली. शिवाय या लग्नामध्ये पॅलेसबाहेर अनेक विंटेज कार दिसून आल्या. ज्याची सध्या मोठी चर्चा होताना दिसून येत आहे. या हायप्रोफाईल लग्नात इतर सेलिब्रेटींप्रमाणे ‘नो फोन पॉलिसी’ लागू करण्यात आली होती. त्यामुळे लग्न मंडपात उपस्थित असलेल्या कोणत्याच पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी नव्हती. शिवाय लग्नात मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्मृती ईरानी यांच्या मुलीच्या या शाही लग्नात कोणताही व्हीआयपी पाहुणा उपस्थित नव्हता. फक्त ७० लोकांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला

error: Content is protected !!