ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

पञकार शशिकांत वारिशेच्या कुंटूंबाची मराठी पञकार परीषदेचे नेते एस एम देशमूख व पदाधीकारी यांनी घेतली भेट परीषदेचा दिला मदतीचा धनादेश

पञकार शशिकांत वारिशेच्या कुंटूंबाची मराठी पञकार परीषदेचे नेते एस एम देशमूख व पदाधीकारी यांनी घेतली भेट परीषदेचा दिला मदतीचा धनादेश

रत्नागीरी प्रतीनीधी; रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पञकार शशीकांत वारिशे यांची निर्घृणपणे हत्या केल्या वर मराठी पञकार परीषदेने हे प्रकरण लावून धरल्याने आरोपी वर गुन्हा दाखल झाला व त्यांला अटक हि झाली या कुंटूंबाला शासनाने मदत केली व इतरानीही मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांनी परीषदेच्या पदाधीका-या सह वारिशे कुंटूंबाची भेट देऊन परीषदेचा मदतीचा धनादेश देऊन या कुंटूंबाला आधार दिला व सर्वोपरी सहकार्याचा शब्द दिला.
पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या झाली.. कुटुंब रस्त्यावर आलं. वृध्द आई आणि मुलगा निराधार झाले. अशा स्थितीत त्याला मदतीचे आवाहन केल्या नंतर महाराष्ट्रातून जवळपास दोन लाख रूपये यशच्या खात्यावर जमा झाले. काही रोख रक्कम आली. मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमूख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, मुंबई शहराध्यक्ष राजा आदाटे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, आनंद तापेकर, खलिपे, राज्य संघटक सुनील वाळुंज या सर्वांनी कशिळे गावात जाऊन शशिकांतच्या परिवाराची भेट घेतली. सांत्वन काय आणि कुणाचे करणार. मुलगा यश अजून शॉक मधून बाहेरच आलेला नाही.. आजी अंथरूणावर खिळून आहे.. आजीची जेव्हा या भेट घेतली तेव्हा तिच्या हुंदक्यांनी परीषद पदाधीकारी कोलमडून पडले. कुठल्या शब्दात या मातेचं सांत्वन करावं ते कळत नाही. सांत्वनाचे शब्द या कुंटूंबाचे दु:खापुढे तोकडे पडले.. परीषद कायम सोबत आहे” असा शब्द देत आणि मदतीचा चेक यशच्या हाती देत या पदाधीकरी यांनी निरोप घेतला. रिफायनरी विरोधी आंदोलनातले चव्हाण आणि काही कार्यकर्ते या परीषद पदाधीकारी यांना भेटले. शशीकांतचया कुटुंबियांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी ते हि प्रयत्न करीत आहेत. आरोपी पंढरीनाथ आंबेरकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानं जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी होती. परीषदेचे नेते एस एस देशमूख यांची राजापूर मध्ये घडणारया प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर आहे. या कुंटूंबाला सर्वोपरी अधार देण्याचे काम होत आहे. मराठी पञकार परीषदेने दिलेल्या या पाठबळा मुळे वारिशे कुंटूंबास मोठा अधार मिळाला आहे. व या कुंटूंबास न्याय दिल्या शिवाय परीषद स्वस्थ बसणार नाही असे ही मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांनी सांगीतले.

error: Content is protected !!