ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरू करून लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करून “मेस्मा ” विधेयकाच्या निषेधार्थ  “लक्ष्यवेधी टरबूज आंदोलन 

जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरू करून लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करून “मेस्मा ” विधेयकाच्या निषेधार्थ  “लक्ष्यवेधी टरबूज आंदोलन
____
महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरीषद, नगरपंचायत कर्मचारी आदिंना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी तसेच शासकीय तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी आमदारांच्या पेन्शन बंद करा या मागण्यांसह दि.१४ मार्च  पासुन जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारकडून संप दडपण्यासाठी “मेस्मा “कायदा विधेयक घाईघाईत मांडल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ऊद्या १३ मार्च सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक लक्ष्यवेधी “टरबूज आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव यांना दिले आहे.
जुनी पेन्शन योजना पुर्ववत  लागु करण्यात यावी
____
राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरीषद, नगरपंचायत आदि.कर्मचा-यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षिततेची हमी देणारी १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यात यावी.
शासन तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करण्यात यावी
___
नागपुर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरू केली तर तिजोरीवर आर्थिक ताण पडेल त्यामुळेच शासन तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींची पेन्शन योजना बंद करण्यात यावी.
  संप दडपण्यासाठी मेस्मा कायदा विधेयक घाईघाईत मांडल्याच्या
निषेधार्थ टरबूज आंदोलन
__
राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीसाठी  दि.१४ मार्च २०२३ रोजी पासुन पुकारलेला बेमुदत संप मोडुन काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा परीरक्षण (मेस्मा) कायदा लागु करण्याची तयारीत असुन  शुक्रवारी घाईघाईत मेस्मा कायद्याचे विधेयक मांडण्यात आले या  दडपशाहीच्या निषेधार्थ “टरबूज आंदोलन “करण्यात येणार आहे .
error: Content is protected !!