ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

दोन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार; वैभव नाईक यांचा दावा

 

काही दिवसांपासून विविध मुद्दयावरून कोकणातलं राजकारण चांगलंच तापल्याचे दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून विरोधककांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असो किंवा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची अटक असो. यावरुन कोकणात जोरदार राजकारण सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. ईडीच्या कारवाईवरुनही नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.

येत्या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ मालवण आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केलाय. आता पर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणे यांचे राजकीय अस्तित्व भाजप ठवरणार आहे. भाजपला आता राणेंची राजकीय दृष्ट्या गरज नसल्याने त्यांना आता पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगत वैभव नाईक यांनी राणेंना डिवचलं आहे. कणकवली येथे पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांनी हे भाकित वर्तवले आहे.

तसेच निलेश राणेंच्या टीकेला प्रतिउत्तर देताना नाईक म्हणाले की, “नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचं पुढे काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समजोता केला ? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा,” अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

error: Content is protected !!