ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

‘त्या’ फोटोवरुन जितेंद्र आव्हाड-शितल म्हात्रेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु

 

मुंबई । पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली.या सभेतमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता. ‘आज आपलं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही, तरीदेखील एवढी गर्दी आली आहे. ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचा आशिर्वाद,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाकडून पलटवार करण्यात येत आहे. त्यातच, शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि व्हिडिओमुळे चांगल्याच चर्चेत राहिलेल्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी उर्दू भाषेत उद्धव ठाकरेंच्या स्वागताचा डिजिटल बोर्ड ट्विट केल्यावरुन जितेंद्र आव्हाड आणि म्हात्रे यांच्या ट्विटरवरुन शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. .

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा गद्दार म्हणत बंडखोर आमदारांवर प्रहार केला. तसेच, आमचं हिंदुत्त्व हे शेंडी जानव्याचं नसल्याचं सांगत हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरुनही भाजपला फटकारलं. तत्पूर्वी, शनिवारी शितल म्हात्रे यांनी उर्दु भाषेतील आशयाचा एक बॅनर शेअर करत उद्धव ठाकरे गटाला प्रश्न विचारला होता.

”ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं.. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??”, असा सवाल केला होता. त्यावर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रिप्लाय देत एकनाथ शिंदेंचाही तशाच आशयातील बॅनर शेअर केला. त्यावरु, दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली.

error: Content is protected !!