ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

प्रत्येक स्त्रीमध्ये संघर्ष करण्याची क्षमता : प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर

प्रत्येक स्त्रीमध्ये संघर्ष करण्याची क्षमता : प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर

सोलापूर – 26:  कर्तृत्वाची भरारी हेच स्त्रीचे आत्मिक सौंदर्य आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे. संघर्ष करण्याची क्षमता तिच्यामध्येे असून ती कमजोर नाही. अलीकडील काही महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा अनेक क्षेत्रांत उमठवला आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर, उपाध्यक्ष, नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न) जि. बीड यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-सोलापूरच्या वतीने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी बोलताना पुढे त्या म्हणाल्या, स्त्रियांचे अनेक नवीन प्रश्‍न निर्माण झाले आहेत. घरातली स्त्री ‘हाऊसवाईफ’ नसून ‘हाऊसमेकर’ आहे. घराच्या जबाबदार्‍यांतच तिचं आयुष्य संपतं. त्यामुळे तिच्या इच्छेप्रमाणे तिला जगता येत नाही. अलीकडे स्त्रियांच्या आयुष्यातला ताणतणाव वाढत चंगळवादी संस्कृतीमुळे नीतिमत्ता ढासळली आहे. त्यामुळे स्त्री बाहेरही व घरातही सुरक्षित नाही. जवळच्या नातेवाइकांकडूनच तिचे शोषण होत आहे. आपल्या मातोश्री प्रख्यात साहित्यिक डॉ. सुहासिनी इर्लेकर यांच्या काही आठवणी त्यांनी  या प्रसंगी कथन केल्या.
या  लेखन स्पर्धत एकूण अठरा महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम-  रेश्मा गुंगे,  द्वितीय- डॉ. विद्युलता पांढरे, तृतीय- अपर्णा उपासे, उत्तेजनार्थ- ॠतुजा दिवाणजी व माधवी अभ्यंकर.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती कटकधोंड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी केला. स्पर्धेच्या परीक्षक प्रा. डॉ. शुभदा उपासे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना कुलकर्णी यांनी केले. आभार बदीउज्जमा बिराजदार यांनी मानले.  या कार्यक्रमास राजेंद्र भोसले, डॉ. नरेंद्र काटीकर, डॉ. अर्जून व्हटकर, गोविंद काळे, फैय्याज शेख, शोभा बोल्ली , तसेच उत्तरेश्वर मठपती , रामकृष्ण अघोर यांच्यासह  मान्यवर,सहभागी स्पर्धक व साहित्य रसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!