ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

संजय शिरसाटांच्या विरोधात जोडे मोरो आंदोलन,

 

आमदार संजय शिरसाट यांनी शिसेनच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते आता शिरसाट यांनी केलेल्या विधानाबद्दल महिला आघाडीमध्ये असंतोष पसरला आहे. ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने क्रांतीचौकात आमदार संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जोरदार निदर्शने करण्यात आली. संजय शिरसाठ यांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय ,मिंधे सरकार हाय, हाय, शिंदे सरकार करायचं काय,खाली मुंडके वर पाय, अशा घोषणा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आल्या.

शिंदे गट शिवसेनेच्यावतीने रविवारी संत एकनाथ रंग मंदिरात आयोजित मेळाव्यात भाषण करताना आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेले विधान ऐकून शिवसेना ठाकरे गटात महिला आघाडी संतप्त झाली. आमदार शिरसाठ यांच्या निषेधार्थ आज क्रांती चौक येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलक महिलांनी आमदार संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि प्रतिमेला शेण खाऊ घालत आंदोलन केले. तसेच संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानप्रकारानी सुषमा अंधारे यांनी थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे त्यामुळे महिला अयोग शिरसाट यांच्या विधाना विर्धीत काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.

error: Content is protected !!