ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

पाऊस गारपिटीने अहाकार कृषी मंत्री चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर.

पाऊस गारपिटीने अहाकार कृषी मंत्री चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर.

भोकरदन  प्रतिनिधी ;- दि.30, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तसेच आमदार संतोष पा. दानवे यांनी आज जालना जिल्ह्याच्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
      भोकरदन , जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने अतोनात नुकसान झाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार तसेच आमदार संतोष दानवे यांनी आज भोकरदन तालुक्यातील विरेंगाव व महोरा शिवारातील नुकसान झालेल्या कांदा व जाफराबाद तालुक्यातील सावंगी शिवारातील ज्वारी पिकाची पाहणी केली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार तसेच आमदार दानवे यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एकही नुकसानग्रस्त पंचनामा पासून वंचित राहू नये अशा ही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हताश न होता, धीर धरावा सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला.
    दरम्यान नुकसानीची पाहणी करीत असताना आज देखील विविध ठिकाणी पाऊस झाला. आणखी दोन – तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
      या पाहणी दौऱ्यात तहसीलदार सुरुप कंकाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाना कापसे, भोकरदन तालुका कृषी अधिकारी स्वाती कागणे, जाफराबाद तालुका कृषी अधिकारी संतोष गायकवाड,गुड्डू कादरी, हुकूम राजपूत, भाऊसाहेब जाधव, वामनराव लहाने आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!