ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

राज ठाकरे यांच्या रत्नागिरी सभेपूर्वी सतीश नारकर यांच्या तालुका निहाय बैठका संपन्न

 

रत्नागिरी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये येत्या ६ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मुंबईसह कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केलीअसून तालुकानिहाय तयारीच्या पाहणीसाठी रत्नागिरी संपर्क अध्यक्ष सतीश नारकर हे दोन दिवसीय रत्नागिरी जिल्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या होत्या .

सतीश नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आयोजित करून कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत राज ठाकरे यांच्या सभेला करण्यात येणाऱ्या नियोजन संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले सोबत रत्नागिरी जिल्हा महिला संपर्क अध्यक्ष स्नेहलताई जाधव ह्यांचे सुद्धा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन लाभले या बैठकांमध्ये सोशल मीडियाच्या प्रभावी वापर करून राज ठाकरे यांच्या सभेला जास्तीत-जास्त नागरिकांना आमंत्रण द्यावे असे त्यांनी या बैठकांमध्ये सांगितले.

तसेच या दौऱ्यामध्ये ०६ मे २०२३ रोजी मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांची सभा होणाऱ्या स्वर्गीय प्रमोद महाजन संकुल क्रीडा मैदानाची रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर यांनी मैदानाची पाहणी केली यावेळी उपस्थित असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधी वर्गाशी सुद्धा संवाद साधला. राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये होणारी सभा न भूतो न भविष्य अशा मोठ्या संख्याने पार पडणार अशी चर्चा आतापासूनच राज्याच्या राजकारणात होताना दिसून येत आहे.

error: Content is protected !!