ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

शरद पवारांची निवृत्ती; आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार?

 

शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होतानाच आता पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यावेळी शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. यातच राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहेत. शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीतील सर्वांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केला. ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना अश्रू अनावर झाले होते. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर नवीन समिती गठीण करण्यात येणार आहे. या समितीत कोण सदस्य असतील, याबाबतची नावे शरद पवार यांनी सूचवली आहेत.

नवीन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गठीत करण्यात येणाऱ्या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य नेत्यांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यान चार नावं घेतली जात आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल या चौघांच्या नावाची चर्चा होत आहे.

error: Content is protected !!