ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

तुळजापूरनंतर आता महागणपती रांजणगाव मंदिरातही ‘वेस्टर्न कपडे अर्थात पाश्चात्य कपड्यावर बंदी

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

तुळजापूरनंतर आता महागणपती रांजणगाव मंदिरातही ‘वेस्टर्न कपडे अर्थात पाश्चात्य कपड्यावर बंदी

बीड (प्रतिनिधी) :- तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिराचा परिसर या ठिकाणी वेस्टर्न कपडे अर्थात पाश्चात्य कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे. या नंतर लगेचच पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर प्रशासनाने देखील असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या बाबत काय भावना उमटतात हे पाहण महत्वाचं असणार आहे.

कोणत्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही

अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरात तोकडे कपडे घातलेले तसेच अंगप्रदर्शन करणारे, असभ्य अशोभनीय वस्त्रधारी, उत्तेजक कपडे घातलेले, हाफ पॅन्ट घातलेले, बर्मुडाधारक यांना आता मंदिरात प्रवेश नाही. वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घातलेल्यांनाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान राखणाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयाच्या बाबत काय भावना उमटतात हे पाहण महत्वाचं असणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड

श्री तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरी काही पुजारी तुळजाभवानी मंदिर परिसरात जीन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तुळजापूर मंदिर प्रशासनाने एक नोटीस काढली आहे. ही नोटीस मंदिर परिसरातील भितींवरती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये पुजाऱ्यांनी ड्रेस कोड शिवाय मंदिरात प्रवेश करू नये अन्यथा देऊळ कवायत कायदा (निजाम कालीन कायदा) नुसार कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मंदिरातील दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

 

error: Content is protected !!