ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड नगर परिषदेच्या सर्व सफाई रोजंदारी कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे, अन्यथा मुख्यमंत्री यांना घेराव घालणार – भाई गौतम आगळे.

बीड नगर परिषदेच्या सर्व सफाई रोजंदारी कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे, अन्यथा मुख्यमंत्री यांना घेराव घालणार – भाई गौतम आगळे.
परळी प्रतिनिधी ;- नगरपरिषद बीड येथील रोजंदारी / कंत्राटी कामगार मागील २२ ते २३ वर्षापासून अगदी प्रामाणिक पणे कार्य करत होते. कोविडच्या काळात सर्व जनता घरात होती, फक्त सफाई कामगार  दररोज नित्य नियमाने कर्तव्य करत होते. त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा यथोचित सन्मान  केला. परंतु मुख्याधिकारी , नगरपरिषद बीड  यांनी सफाई कामगारांना अयोग्य व बेकायदेशीर रित्या १ जून २०२३पासून बेरोजगार केले. त्या सर्व १५० कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे अन्यथा सफाई कामगारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालणार  असल्याचा इशारा रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव, तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे यांनी दिला आहे.
         या बाबत सविस्तर माहिती अशी की नगरपरिषद बीड मुख्याधिकारी,नीता अंधारे यांनी सफाई कामगारांना १ जून २०२३ रोजी अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले. त्यांना तात्काळ कामावर घ्यावे, किमान वेतन मिळावे, प्रचलित अद्यावत कामगार कायद्याच्या सोयी सवलती मिळाव्यात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा यु. एन.ए . नंबर मिळावा, आदी विविध मागण्या संदर्भात दिनांक १३ जून २०२३ पासून शासन व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता नगरपरिषद बीड समोर लोकशाही मार्गाने धरणे निदर्शने आंदोलन सुरू केले. मात्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे सफाई कामगार संतप्त झाला आहे.
      ऐन आषाढी यात्रा व पावसाळ्याच्या तोंडावर सफाई कामगारांना बेरोजगार केल्यामुळे संपूर्ण बीड शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यापूर्वी सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यासाठी रोजंदारी मजदूर सेना या संघटनेच्या बॅनरखाली सातत्याने आंदोलने केली आहेत याची दखल घेऊन दिनांक २८ सप्टेंर २०२२ व ११जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी बीड, राधा बिनोद शर्मा यांनी प्रगती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे  संयुक्त बैठका घेतल्या होत्या. सदरील बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाले. मात्र बीड नगर परिषदेने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा ११ मे २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी महोदया, दीपा मुधोळ –  मुंडे यांच्या सूचनेमुळे जिल्हा सह आयुक्त( डॉ.बी.डी. बीक्कड ) नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय,बीड. यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. तसे इतिवृत्त जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत यांना कळविण्यात आले. नगरपरिषद, बीड यांनी नोव्हेंबर २०२२ रोजी अशोक इंटरप्राईजेस ठाणे या एजन्सीला तीन वर्षाचे कंत्राट करारनामा करून दिले होते. सदरील एजन्सीने सफाई कामगारांना अकरा हजार रुपये दरमहा वेतन देण्याचे वचन पूर्ण केले. त्या अगोदर कनक इंटरप्राईजेस ही एजन्सी सफाई कामगारांना फक्त नऊ हजार रुपये तुटपुंजे वेतन देवून त्यांची पिळवणूक करत होती. त्या मुळे सदरील कंत्राट बंद करून अशोक इंटरप्राईजेस ठाणे या एजन्सीला कार्यारंभ आदेश दिला होता. परंतु मुख्याधिकारी नगरपरिषद बीड, नीता अंधारे यांनी सदरिल एजन्सीचे काम १ जून २०२३ पासून बंद केले त्याची पूर्वकल्पना कामगारांना दिली नाही,ते कृत्य बेकायदेशीर आहे. त्यामुळे सफाई कामगारांनी स्वयंस्फूर्तीने दिनांक १३ जून २०२३ पासून न्याय मिळेपर्यंत नगरपरिषद बीड,  समोर धरणे व निदर्शने आंदोलन सुरू केले,तरी अद्याप न्याय मिळाला नाही. मागील संपूर्ण नोकरीच्या व पगाराच्या सलगतेसह पूर्ववत कामावर तात्काळ रुजू करून घ्यावे अन्यथा संतप्त कामगार अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालतील असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. सदरील निवेदनावर रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे, मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड, जिल्हा अध्यक्षा अनिता बचुटे, सुनीता जोगदंड, बबीता तांगडे, कविता जोगदंड, बीना सौदा कौशल्या जाधव यांच्या स्वाक्षरी केलेल्या आहेत अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.
error: Content is protected !!