ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

मंडणगड शहरातील पाणी टंचाई विरोधात, विरोधकांचा नगर पंचायतीवर हंडामोर्चा

शहरातील पाणी टंचाई विरोधात, विरोधकांचा नगर पंचायतीवर हंडामोर्चा

मंडणगड प्रतिनिधी दि. 23-

मंडणगड शहराच्या पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाचे नगरसेवकांनी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरीकांसमवेत मंडणगड नगरपंचायतीवर 23 जून 2023 हंडामोर्चा काढला या प्रश्नाकरिता नगरसेविकांनी 22 जून 2023 रोजी लेखी निवेदनही देत बुधवारी पुर्ण शहरास पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. नगरपंचायत सत्ताधारी व प्रशासन यांच्या निषेधाच्या घोषणा देत व हंडे वाजवत आंदोलक नगरपंचायत कार्यालयात दाखल झाले आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला आंदोलकांनी मोकळ्या जागेत बैठक मारुन आमचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची भुमीका घेतली. यानंतर घोषणाबाजीकरत उपस्थितांनी पाण्याअभावी उपस्थित झालेल्या समस्यांचा पाढा वाचत. प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे विरोधात असलेल्या असंतोषाला व्यक्त केला. यावेळी नगरपंचात विरोधी गटाचे नेते नगरसेवक विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभिळकर, निलेश सापटे, प्रविण जाधव, सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, योगेश जाधव, अर्जुन भोसले, काशीराम सापटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यालयात उपस्थित नगरपंचायत पाणी पुरवठा अधिकारी विकास साळवी लेखाअधिकारी गोपीनाथ करडे यांनी आंदोलकांना समाजवण्याचा प्रयत्न केला व प्रश्नासंदर्भात प्रशासन करीत असलेले काम व पाणी पातळी खाल्यावल्याने निर्माण झालेल्या समस्यां यांची उपस्थितांना माहीती दिली मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहीले शहरास टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नेमुनही पुढे नियोजन का झाले नाही असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. आंदोलन सुरु असताना नगरपंचायत कार्यालयात उपस्थित उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष सुभाष सापटे महिला बालकल्याण समिती सभापती समृध्दी शिगवण यांनी आंदोलकांना सभागृहात येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले तसेच या संदर्भात वस्तुस्थिती जाणुन घेण्याची विनंती केली मात्र आंदोलक व सत्ताधारी आपल्या म्हणण्यावर ठाम राहील्याने सत्ताधारी व आंदोलक यांच्यातील संवाद होवू शकला नाही सुमारे दोन तास चाललेल्या गदारोळानंतर प्रशासनाने 24 जून 2023 पासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

error: Content is protected !!