ब्रेकिंग न्युज
अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार

आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यत शैक्षणिक शालेय फि मध्ये सवलत द्यावी अशी मागणी करत संभाजी दहातोंडे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले.

 

 

‘आरटीई’ शैक्षणिक सवलत दहावीपर्यत मिळावी
मराठा महासंघाची मागणी : संभाजी दहातोंडे यांचे केसरकरांना निवेदन

मुंबई : आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत शालेय फी मध्ये सवलत दिली मात्र, ज्या वर्गासाठी भरमसाठ फी आहे त्याच काळात म्हणजे नववीपासून सबंधित पालकाना शुल्क भरावे लागत आहे.
हे शुल्क भरण्याची ऐपत नसलेल्या पालकांच्या पाल्याचे शिक्षण अडचणीत येत आहे. राज्यातील सुमारे 70 हजार अधिक विद्या त्यांच्या क्षणाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी ही सवलत दहावीपर्यत करावी अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे.

संभाजीराव दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरिब व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटूंबातील बालकांना नामांकित खाजगी शाळांत शिक्षण घेता यावे यासाठी शासनआरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत 25% जागा राखीव ठेवून त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो. संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासन भरते. 2014 साली सर्वप्रथम प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची आता मुदत संपली आहे. या उपक्रमामुळे गरिब कुटूंबातील मुलांनाही नामांकित खाजगी शाळांत शिक्षण घेता येत आहे. यात बहूतांश पाल्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजुर व वंचित घटकातील आहे. मात्र ही शैक्षणिक सवलत आठवी वर्गापर्यतच आहे. नववीपासून सबंधित शाळांना शैक्षणिक शुल्क (फिस) सबंधित पालकांना भरावी लागते. ज्या काळात जास्तीचे शुल्क आहे अशाच काळात ही सवलत बंद होत आहे.
मुळात गरिब असल्यानेच अशा पालकांना शैक्षणिक सवलत दिली आहे. नववी व दहावीच्या वर्गासाठी खाजगी शाळांत लाखो रुपये शु्ल्क आहे. एवढी फिस भरु न शकणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याने नववी व दहावी वर्गात शिकवताना मोठा त्रास सोसावा लागत आहे. आर्थिक ताण वाचवण्यासाठी अन्य शाळांतही प्रवेशही मिळत नाही. त्यामुळे नववी व दहावी वर्गासाठीच्या प्रवेश अन्य निर्माण होणाऱ्या अडचणी पाहता आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेऊन अनेक पालकांना मनस्ताप सोसावा लागत आहेत. त्यामुळे आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या राज्यातील लाखो पालकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी आरटीई अंतर्गत अंतर्गत दहावीपर्यत शैक्षणिक शुल्क शिक्षण सवलत करावी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे. राज्यातील गरीब वंचित कुटुंबातील शिक्षणाचा हा गंभीर प्रश्न असा आहे याबाबत शासनाने आंदोलन करण्याचा इशाराही दहातोंडे यांनी दिला आहे

error: Content is protected !!