ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

‘9 वर्षांत 50 लाख कोटींची कामे, एकाही वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप नाही’-नितीन गडकरीं

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.सूर्योदय महाराष्ट्र

‘9 वर्षांत 50 लाख कोटींची कामे, एकाही वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप नाही’-नितीन गडकरीं

मुंबई प्रतिनिधी):-आता पेट्रोलची गरज भासणार ना, डिझेल किंवा सीएनजीसारख्या महागड्या इंधनाची. ऑगस्ट महिन्यापासून इथेनॉलवर चालणाऱ्या कार लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. अशी घोषणा नितीन गडकारी यांनी केली. ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर चालणारी कार मार्केटमध्ये येईल. भाजपने काल (23 जून, शुक्रवार) मुंबईत गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. मोदी @ 9 मोहिमेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.

 

या गोलमेज परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात हे सर्व नेते केंद्र सरकारच्या योजना आणि उपलब्धींची माहिती देत होते. यासंदर्भात नितीन गडकरी यांनी गेल्या नऊ वर्षांत भारताने किती प्रगती केली आहे, याचे उदाहरण देत ऑगस्ट महिन्यापासून इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्याही बाजारात येत असल्याचे सांगितले.

100% बायो इथेनॉलवर चालणारी बाईक आणि कार बाजारात येणार-
नितीन गडकरी म्हणाले की, ऑगस्ट महिन्यापासून केवळ कारच नव्हे तर इथेनॉलवर चालणाऱ्या बाइक्सही मार्केटमध्ये दाखल होतील. अशाप्रकारे आता इथेनॉलवर चालणाऱ्या चारचाकींबरोबरच दुचाकीही लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. टोयोटा कंपनी ही वाहने मार्केटमध्ये आणत आहे. ही वाहने 100 टक्के बायो-इथेनॉलवर चालतील आणि इथेनॉल इंधन पेट्रोलपेक्षा खूपच स्वस्त असेल. तसेच प्रदूषणही होणार नाही. असे देखील गडकरी म्हणाले.

‘केंद्रीय योजनांचा थेट लाभ, गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार’-
कार्यक्रमावेळी नितीन गडकरी म्हणाले, भारतातील 37 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ झाला आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना लाभ पोहोचवण्यात आला. 9.6 कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले. जन धन योजनेअंतर्गत 49 कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन ते साडेतीन कोटी लोकांना घरे देण्यात आली. या योजना सर्व गरीब नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देतात.

‘9 वर्षांत 50 लाख कोटींची कामे, एकाही वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप नाही’-
नितीन गडकरी म्हणाले की, भाजपच्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत – राष्ट्रवाद, राष्ट्र प्रथम आणि देश चालवण्यासाठी सर्वोत्तम सरकार आहे. गेल्या नऊ वर्षांत पन्नास लाख कोटींची कामे पूर्ण झाली, एकाही कामावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. कामात पारदर्शकता ठेवली. डिजिटलायझेशनच्या कामाला गती दिली. गडकरी म्हणाले, समाजवादी पक्षांना देशात स्थान राहिलं नाही. कम्युनिस्ट पक्षही हळूहळू संपली. भाजपच्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. राष्ट्रवाद , राष्ट्र प्रथम आणि ते राष्ट्र चालवायला चांगले सरकार.

error: Content is protected !!