ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पनवेलमध्ये खळबळ :सोसायटीत सापडले PFI जिंदाबाद लिहिलेले स्टिकर्स आणि सुतळी बॉम्ब

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

पनवेलमध्ये खळबळ :सोसायटीत सापडले PFI जिंदाबाद लिहिलेले स्टिकर्स आणि सुतळी बॉम्ब

पनवेल(प्रतिनिधी) :- PFI पनवेल कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाल आहे. पीएफआय जिंदाबाद असे मेसेज लिहिलेले स्टीकर्स आणि सुतळी बॉम्ब नागरिकांना आढळलेत. त्यामुळे खळबळ माजलीये. रहिवाशांनी ही बाब खांन्देश्वर पोलीसांना सांगितल्या पोलीसांनी पाहणी करुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही नवी मुबई, भिवंडीसह अन्य शहरात छापे मारून PFi संघटनेशी संलग्न असणाऱ्या जवळपास 20 व्यक्तींना ताब्यात घेतलंय. आणि आता हे पनवेल कनेक्शन समोर आले आहे.

786 हा नंबर घरा बाहेर लिहल्याने रहिवाशांमध्ये घबराट
नवीन पनवेल सेक्टर 19 मधील नीलागण सोसायटीच्या आवरात ही घटना घडली आहे. सोसायटीमधील काही फ्लॅटच्या बाहेरील भींतीवर हा मेसेज लिहल्याचे समोर आले आहे. सदर घटना सोसायटी रहिवाशांनी खांन्देश्वर पोलीसांनी सांगितल्या नंतर पोलीसांनी पाहणी करीत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पीएफआय संघटना पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान 786 हा नंबर घरा बाहेर लिहल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

पनवेलमधून पीएफआयच्या 4 सदस्यांना अटक
2022 मध्ये राष्ट्रीय यंत्रणा ( NIA ) ने देशभरासह महाराष्ट्र् राज्यातील पुणे, मालेगाव आणि नवी मुबई , भिवंडी सह अन्य शहरात छापे मारून PFI संघटनेशी संलग्न असणाऱ्या जवळपास 20 व्यक्तींना ताब्यात घेतले होते. कार्यालय देखील सील केले होते. या मध्ये पनवेल मधील काही जणांचा समावेश होता. नविन पनवेल मधील देशभरात पीएफआयवर छापेमारी केल्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली. पनवेलमधून पीएफआयच्या 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. एटीएसनं ही कारवाई केली होती. अटकेतील एक जण पनवेलमधील पीएफआयचा सचिव आहे.. या सर्वांवर काळाचौकी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

1113 पानी चार्जशीट
या प्रकरणी आता एटीएसने 5 सदस्यांची चौकशी करून 1113 पानी चार्जशीट दाखल केली होती. त्यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. 2047 सालापर्यंत भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा PFI चा प्लान होता, त्यासाठी देशविरोधी कारवाया करण्यासाठी राज्यातील अनेक भागात गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर आली होती. पीएफआयने चेंबूर, धारावी, कुर्ला, ठाणे, नेरूळ, पनवेल आणि मुंब्रा या ठिकाणी बैठका झाल्याचं तपासात निष्पन्न झाले होते.

error: Content is protected !!