ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पंकजा मुंडे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

पंकजा मुंडे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष

बीड(प्रतिनिधी):-, गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांनी देखील अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. दोघा नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं होतं.

त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अखेर आज आपण दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिष घेणार आहोत असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राज्यात सुरू असलेल्य घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे . पकंजा मुंडे काय भूमिका घेणार? एखादी मोठी घोषणा करणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

error: Content is protected !!