ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

राज्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज ठाकरे यांना लोकांनी सत्तेत बसवलं पाहिजे.

 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा राजकीय भूकंप केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत या आशयाचे बॅनर राज्यभरात झळकले. त्यानंतर मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात असतानाच आता राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते थाट महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. ‘दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचे आहे. ते म्हणजे राज ठाकरे इतर कोणी नाही.’, असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. ‘सध्याच्या राजकीय परिस्थिती खूपच भीषण आहे. फक्त राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाहीत. त्यामुळेच अशात ‘एक सही संतापाची’ या पद्धतीची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज ठाकरे यांना लोकांनी सत्तेत बसवलं पाहिजे.’, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.

error: Content is protected !!