ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

जळगावातील धक्कादायक घटना; दोन गटांत तुफान दगडफेक

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

जळगावातील धक्कादायक घटना; दोन गटांत तुफान दगडफेक

जळगाव(प्रतिनिधी):- जळगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. धार्मिक स्थळाच्या बांधकामाला विरोध केल्यामुळे दोन गटात तुफान राडा झाला आहे. त्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये सहा जण जखमी झाले आहेत. जळगावच्या सुप्रीम कॉलनी परिसरातील ही घटना आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.

नेमकं काय घडलं?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या सुप्रीम कॉलनी परिसरात एका धार्मिकस्थळी बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला एका गटानं विरोध केल्यामुळे दोन गट आमने-सामने आले. जोरदार राडा झाला. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दोन्ही गटातील सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांची घटनास्थळी धाव

दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अचानक घटलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

error: Content is protected !!