ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

एक सही संतापाची… बदलत्या राजकारणावर मंडणगड मध्ये मनसेचा अभिनव उपक्रम..

एक सही संतापाची… बदलत्या राजकारणावर मंडणगड मध्ये मनसेचा अभिनव उपक्रम..

मंडणगड प्रतिनिधी

सध्या राजकारणात संपूर्ण पक्ष फुटल्याच्या घडामोडी घडत आहेत सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे दोन दिवस राज्यभरात स्वाक्षरी मोहीम घेऊन फक्त एक सही संतापाची असे आंदोलन छेडण्यास सुरुवात करण्यात आली आहे .मंडणगड बस स्थानक येथे मनसेचे तालुका अध्यक्ष नवज्योत सिंग गौड यांच्या नेतृत्वाखाली एक सही संतापाची या अभियानाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात आपले असले प्रकार सुरू आहे. निवडणुकीत एकदा का मत दिले की राजकारणी लोकांना गृहीत धरू लागले आहेत .याच मानसिकतेमध्ये सध्या सर्व राजकीय पक्ष आल्याची दिसत ते त्यामुळे नागरिकांच्या मनातील चीड व्यक्त करण्यासाठी मनसेने राज्यभरात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला .असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे मंडणगड शहरातील बस स्थानक येथे एक सही संतापाची हे नागरिकांसाठी व्यासपीठ निर्माण केले आहे. मंडणगड मधील जनतेने स्फुर्तपणे प्रतिसाद दिले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष नवज्योत सिंग गौड , महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष तेजस गस्ते,माजी तालुकाध्यक्ष महेश कंचावडे,माजी शहराध्यक्ष दत्ताजी महाडिक, राहुल खांबे, उप तालुकाध्यक्ष मुस्तकीम कारविणकर,सौरभ लेंढे, प्रथमेश बर्वे ,महेश मोरे ,पंकज चाळके, नरेश बर्वे, दिपक निमदे,आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!