ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतले श्रीक्षेत्र संगमेश्वराचे दर्शन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – द्रौपदी ऐवळे

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली.
पदभार स्वीकारल्यानंतर नुतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कूडल संगम श्रीक्षेत्र संगमेश्वरांचे दर्शन घेतले.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल या तीर्थक्षेत्राचा पर्यटनस्थळ विकास यावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.
जास्तीत जास्त निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून आपण मिळवू, आणि हत्तरसंग कुडलला राज्यातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवू असे आमदार सुभाष देशमुख यांनीही बोलताना सांगितले.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, तहसीलदार राजशेखर लिंबारे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडल, भाजपाचे सरचिटणीस यतीन शहा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!