ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

नाशिक येथे स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प

नाशिक येथे स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प
खा. हेमंत गोडसे यांचे ‘राजकारणाचे बदलते स्वरूप आणि वास्तव’वर व्याख्यान
नाशिक : दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प खा. हेमंत गोडसे हे ‘राजकारणाचे बदलते स्वरूप आणि वास्तव’ या विषयावर गुंफणार आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, सभागृह, कॅनडा कॉर्नर,नाशिक येथे मंगळवार, दि.२९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. तानाजीराव जायभावे, सहसचिव, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था,नाशिक यांची उपस्थिती राहणार आहे.  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेनुसार या वर्षीपासून स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृत्यर्थ मासिक व्याख्यानमाला आरंभ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक  दिलीप के. कोठावदे नाशिक शहर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डाॅ. प्रभू गोरे यांच्यासह कार्यकारिणीने केले आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
error: Content is protected !!