ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

इंग्रजी माध्यमाच्या ‘ मिस्टेक मास्तरांनाच’ जमेना इंग्लिश, लोणी काळभोरमधील शाळेचा कारनामा.

मुलांना सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण देत असताना शिक्षकच बेजबाबदार पणे अशा चुका करत असल्याचा दावा पालकांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या वर्गपाठामधील झालेली चूक शिक्षकांच्या निदर्शनास आली नसल्याने चर्चा.

 

प्रतिनिधी : निलेश हांडे

 

लोणी काळभोर : पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेची क्रेझ निर्माण झाल्यामुळे या संधीचा फायदा घेत अनेक खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. या शाळेतील शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत नेहमीच चर्चा होत असते. याच चर्चेला बळ देणारा एक दाखला सध्या चर्चेत आला आहे. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इयत्ता पहिली मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेत वर्गपाठ दिला होता, हा वर्गपाठ विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्या नंतर शिक्षकांनी तो आंधळेपणाने तपासल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रकार असा आहे की वर्गपाठामध्ये मानवी शरीरामध्ये डोळे, कान, नाक, हात, जीभ इत्यादी अवयव यांची संख्या किती असते ती रिकाम्या जागे मध्ये भरायची होती, पण यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही संख्या चुकीची लिहिली होती.मात्र, या नंतर शिक्षकाने हा अभ्यास तपासून लाल पेनाने बरोबरच असल्याचा शेरा दिला. तदनंतर विद्यार्थ्यांचा घरी आल्यानंतर पालकांनी दिवसभरातील शाळेतील अभ्यास पाहण्यास घेतला असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला, पालकांनी त्वरित समय सूचकता दाखवत वर्ग शिक्षकांना वर्गपाठच्या पुस्तकाचा व्हॉट्स ॲप वर फोटो काढून पाठवत विचारणा केली असता शिक्षकाने ‘ कृपया यावेळी सहकार्य करा, यापुढे काळजी घेऊ’ असा संदेश पाठवत माफी मागितली.

‘ मिस्टेक मास्तर’ यांनी या प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी ‘ त्या ‘ विद्यार्थ्याला शाळेत आल्या नंतर, मला मेसेज करून तुझे घरचे कसे काय विचारू शकतात तपासलेले अभ्यास चूक आहे, याचाच राग आल्यामुळे शिक्षकाने ६ वर्षाच्या चिमुरड्याला धमकावले. ‘चोर तो चोर वर शिरजोर ‘ या मराठी म्हणी प्रमाणे या घटनेतून इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांना इंग्रजी जमेना का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. पालकांना इंग्रजी माध्यमाची भुरळ पाडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे काम अनेक खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून सुरू असते. मात्र, या शाळेत शिक्षण देणारे शिक्षक त्या गुणवत्तेचे असतात का? असा प्रश्न या नमुन्यावरून उपस्थित झाला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांनी अशा चुका केल्यामुळे हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.

error: Content is protected !!