ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पुणे ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक

 

पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर आता त्याच्या दोन मैत्रिणींनाही अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावे आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललित सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी या दोघींनीच त्याला मदत केल्याचेही बोलले जात आहे.

ललित हा फरार असल्याच्या काळात तो सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. महत्वाचे म्हणजे, ड्रग्जच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसाही ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याचीही माहिती लवकरच समोर येईल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास नाशिक शहरातून प्रज्ञा आणि अर्चना या दोघींनी अटक केली. या दोघींनाही आज पुणे न्यायलायात हजर करण्यात येणार आहे.

पुण्याहून फरार झाल्यानंतर तो थेट नाशकात आला आणि येथील त्याच्या निकटवर्तीय महिलेकडे रात्रभर मुक्काम ठोकला होता. तिच्याकडून २५ लाखांची रोकड घेऊन तो नाशकातून बाहेर पडला, अशी माहिती नाशिकपोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीप्रमाणे मॅफेड्रोन हे ड्रग्ज बाहेरच्या देशातून भारतात आणले जाते. ललितकडे मात्र हे ड्रग्ज बनवण्यासाठी तज्ज्ञांची टीम होती. त्याचा भाऊ भूषण ‘एमडी’ उत्पादन करत असल्याचे समोर आले. ललितने याआधी रांजणगाव येथील कारखान्यात १३२ किलो मॅफेड्रोन बनविले होते, त्यातील ११२ किलो मॅफेड्रोन त्याने विकले होते, तर २० किलो पोलिसांना सापडले होते.

error: Content is protected !!