ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अजित पवारांना बारामतीत प्रवेशबंदी; थेट मराठा आंदोलकांनी दिला इशारा

मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेट संपल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अशातच जरांगे पाटलांनी आरक्षण मिळूपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात यावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला मराठा समाजाकडून उत्सुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आरक्षणांसाठी सरकारला दिलेली डेलाईन हुकल्याने मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाने देखील आक्रमक भूमिका नेत्यांना अनेक ठिकाणी प्रवेश बंदी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांना देखील या प्रवेश बंदीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत मराठा समाजाने प्रवेश बंदी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने तसं आवाहन अजित पवार यांना केलं आहे. या आवाहनामुळे मराठा आंदोलक आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शनिवारी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्याआधी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र अजितदादांनी येथे येऊ नये, असं आवाहन मराठा समाज बांधवांनी केलं आहे.

error: Content is protected !!