ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

– भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.विलास कविटकर यांनी केला पत्रकारांचा यथोचित सन्मान

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील पहिले नियतकालिक या दिवशी सुरु केले असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक ६ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी शहरातील श्री.संत रुपलाल महाराज कॉम्प्लेक्स पान अटाई येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, दि.पॉवर ऑफ मिडिया व तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून डॉ.विलासराव कविटकर भाजपा सरचिटणीस (महामंत्री) अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ.विलासराव कविटकर यांनी उपस्थित पत्रकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच पेन व डायरी देवून यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राम वैभव साप्ताहिकचे मुख्य संपादक शिवदासजी मते, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विलासराव कविटकर, पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाशजी अहिरे, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक देविदासजी नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा साबळे, दी.पॉवर ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष मनोहराव मुरकुटे, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकरराव टिपरे विचार पिठावर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर, पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे, राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला आभिवादन केले. आणि तालुक्यातील समस्त उपस्थित पत्रकारांना मान्यवरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संबोधित केले. तसेच उपस्थित पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचलन मनोज मेळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल माकोडे यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार गजानन चांदुरकर, अशोक पिंजरकर, जयेंद्र गाडगे, प्रविण बोके, सुनिल माकोडे, गजेंद्र मंडलीक, सागर साबळे, रविंद्र वानखडे, रमेश सावळे, महेंद्र भगत, प्रेमदास तायडे, श्रीकांत नाथे, मनोज मेळे, पंकज हिरुळकर, सचिन इंगळे, कुशल चौधरी, अनंत मोहोड, कैलाश वाकपांजर, महेश वाकपांजर, मंगेश इंगळे, नागेश गोळे, सुनिल पाखरे, शाम कळमकर, दिलीप साबळे, संघरत्न सरदार, सुजित काठोळे, नंदकिशोर पाटिल, सुशील बहिरे सह शहर व तालुक्यातील समस्त पत्रकार उपस्थित होते.

error: Content is protected !!