ब्रेकिंग न्युज
अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार

तुमच्या फास्टटॅगचा KYC अपूर्ण असेल तर 31 जानेवारीनंतर होणार बंद

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

तुमच्या फास्टटॅगचा KYC अपूर्ण असेल तर 31 जानेवारीनंतर होणार बंद

टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या फास्टटॅगचा KYC अपूर्ण असेल तर 31 जानेवारीनंतर तो बंद केला जाईल. नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. One Vehicle One FASTag या मोहिमेअंतर्गत फास्टटॅगच्या वापरण्याच्या चांगल्या अनुभवाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 31 जानेवरीपर्यंत फास्टटॅगची केवायसी पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. असं न केल्यास त्या फास्टटॅग धारकांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे किंवा तो फास्टटॅग बंद केला जाईल.

तसंच कारवर एकापेक्षा जास्त फास्टटॅग असणाऱ्या वाहनचालकांचं अकाऊंट ब्लॅकलिस्ट केलं जाणार असल्यांचही नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने सांगितलं आहे. केवायसी पूर्ण न केल्यास फास्टटॅग बंद होईलच पण वाहनचालकांच्या खिशावरही ताण वाढणार आहे. वाहनचालकांना दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे NHAI ने सर्व फास्टटॅग धारकांना KYC पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने 31 जानेवारीपर्यंत वन व्हेईकल, वन फास्टटॅग योजना लागू करण्याची डेडलाईन निश्चित केली आहे.

अनेक वाहनचालक एकापेक्षा अधिक फास्टटॅगचा वापर करतात. पण यापुढे असं करणं बेकायदेशीर असल्याचं नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने म्हटलं आहे. यापुढे प्रत्येक वाहनाला एकच Fastag असणार आहे. आरबीआयच्या गाईडलाईन नुसार केवायसी अपडेट न केल्यास फास्टटॅग बंद केलं जाणार आहे. सध्या देशात 8 कोटीपेक्षा जास्त लोक फास्टटॅगचा वापर करतात.

फास्टटॅग म्हणजे काय?
टोल नाक्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि महामार्गावर विनाअडथळा वाहतुकीसाठी ‘फास्ट टॅग’ प्रणालीला सुरु करण्यात आली. देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावर 1 डिसेंबर 2019 नंतर फास्टटॅगद्वारे टोल भरण्याचे निर्देश देण्यात आले. कॅशलेस व्यवहार न करता पर्यायाने टोलनाक्यावर रांग लागू नये यासाठी फास्टटॅग प्रणाली सुरु करण्यात आली. हा फास्टटॅग स्टिकरसारखा असून तो कारच्या पुढच्या काचेवर चिटकवला जातो. फास्टटॅग हा डिजिटल स्टिकर असून ोत रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर काम करतं. फास्टटॅग काढल्यानंतर टोलची रक्कम त्या वाहनचालकाच्या प्रीपेज अकाऊंट किंवा बँक अकाऊंटमध्ये थेट कापली जाते.

फास्टटॅगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे फास्टटॅगमुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी झाली आहे. तसंच फास्टटॅगमुळे सरकारकडे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्डही तयार झालाय. यामुळे एखादी गाडी ट्रॅक करणं सोपं झालंय.

error: Content is protected !!