ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

सावधान :फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, करू नका या चुका

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

सावधान :फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, करू नका या चुका

नवी दिल्लीः Hackers नवीन नवीन पद्धतीने स्कॅम करीत आहेत. अनेकदा असे पाहिले जात आहे की, एक मेसेज पाठवून अकाउंटमधून पैसे गायब केले जात आहेत. जर तुम्हाला सुद्धा असाच मेसेज आला असेल तर अलर्ट राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की, यूजर्सच्या अकाउंट मधून कशा प्रकारे मेसेज येत आहेत. खरं म्हणजे लोकांना नोकरी देण्याच्या नावाखाली मेसेज पाठवले जात आहेत. यासोबत एक लिंक सुद्धा दिली जात आहे.

मेसेज मध्ये देण्यात आलेल्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केले तर थेट एक व्हॉट्सअॅप चॅट मध्ये जाता. या ठिकाणी तुमची सर्व माहिती मिळवली जाते. यानंतर ६० हजार रुपये महिना नोकरीची ऑफर दिली जाते. नोकरीचे नाव ऐकताच अनेक जण या अमिषाला बळी पडतात. याचाच फायदा स्कॅमर्स घेत आहेत. यानंतर तुमच्याकडे ते खासगी माहिती मागवतात. नोकरीसाठी मुलाखत देण्याचे आश्वासन सुद्धा देतात.

काही वेळेनंतर तुम्हाला अन्य व्यक्तीच्या कॉलशी जोडले जाते. इंटरव्ह्यू नंतर नोकरी ऑफर केली जाते. यानंतर तुमचे आधार कार्ड आणि बँक डिटेल्स पाठवण्यास सांगितले जाते. जर बँक डिटेल्सची माहिती कशासाठी, असे विचारल्यास तुमची सॅलरी याच अकाउंट मध्ये जमा होईल असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक जण आपल्या बँकेची डिटेल्स देतात. याचाच फायदा हॅकर्स घेत आहेत.

या ठिकाणापासून स्कॅम सुरू होतो. या ठिकाणी बँक अकाउंट व्हेरिफाय करणे सुरू केले जाते. या बदल्यात ओटीपी सांगण्यास दबाव केला जातो. जर तुमच्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी सांगितल्यास स्कॅमर्सला स्कॅम करणे खूप सोपे होते. तुमच्या फोनवर एक मेसेज येतो. त्यातून तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात.

error: Content is protected !!