ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

श्रीक्षेत्र मार्डी येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभुते

साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने देशभर आयोजिलेल्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र मार्डी येथे श्रीरामांची दिंडी मिरवणूक, भजन मंगल अक्षता सोहळा आधी उपक्रमांचे आयोजन केले होते.
दरम्यान या सोहळ्याच्या आदल्या दिवशी श्रीक्षेत्र मार्डी येथील 42 देवदेवतांची मंदिरे व ठाण्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच महिबूब सुबानी दर्गा व मज्जिदीचीही स्वच्छता करण्यात आली. गावाच्या मुख्य वेशीतील दक्षिण मुखी मारुती मंदिरात हा सोहळा संपन्न झाला शनिवारी रात्रभर ग्रंथराज रामायण ग्रंथाचे वाचन करण्यात आले. पहाटे पाच वाजता या पारायणाचा समारोप झाला सकाळी गावातील सर्व देवतांचे अभिषेक , पूजा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता बग्गीमध्ये श्रीरामचंद्रांची प्रतिमा ठेवण्यात आली. सुरुवातीला हलगी त्यानंतर धनगरी ढोल त्यानंतर संबळ व प्रभू श्री रामचंद्रांच्या रथाजवळ मंडळ तसेच श्री नागनाथाचे भजन असा दिंडी मिरवणुकीमधील क्रम होता.
सकाळी दहा वाजल्यापासून मंदिरात भजन सुरू होते.दुपारी 12.29 वाजता महाआरती व मंगल अक्षता सोहळा झाला. नागनाथ देवस्थानचे खर्गे नागेश स्वामी महाराज, सरपंच प्रांजली पवार, उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, भाजपचे नेते शहाजी पवार, ज्येष्ठ नेते व कारसेवक शिवाजी सोनार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघ चालक चंद्रकांत गडेकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी 1990 व 1992 साली कारसेवेसाठी गावातून गेलेल्या 26 कारसेवकांचा खर्गे नागेश स्वामी महाराज यांच्या हस्ते सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिश्रम घेतले. ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अन् अश्रूंना वाट मोकळी करून दिली

कारसेवक विष्णू जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना त्यावेळची चित्तथरारक आठवण सांगितली. तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला.अन त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

महिलांना अयोध्या वारी अन् साडेतीनशे किलोची बुंदी

भाजपचे नेते शहाजी पवार यांनी प्रसादासाठी साडेतीनशे किलोची बुंदी दिली. तर या सोहळ्याला महिलांची असलेली उपस्थिती पाहून पवार यांनी अयोध्येला प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला येण्यासाठी इच्छुक असलेल्या माता भगिनींना मोफत अयोध्या तीर्थयात्रा घडविणार असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!